शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

काहींनी सोडले मैदान, काहींची दावेदारी कायम

By admin | Updated: October 2, 2014 01:23 IST

वाशिम जिल्ह्यातील विधानसभेच्या कुरूक्षेत्रातून ४८ उमेदवारांची माघार.

वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात १0५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी १ ऑक्टोबरला तब्बल ४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. यामध्ये वाशिम मतदारसंघातील ९, कारंजा मतदारसंघातील २३ तर रिसोड मतदारसंघातील १६ उमेदवारांचा समावेश आहे.त्यामुळे आता तीनही मतदारसंघात ५७ उमेदवार रिंगणात कायम आहेत. वाशिम विधानसभा मतदारसंघात २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये काही पक्षांच्या बंडखोरांचाही समावेश होता. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यातील ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आज अखेर २0 उमेदवार रिंगणात कायम आहेत. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांचाही समावेश आहे. कारंजा मतदारसंघात सर्वाधिक ४४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी २३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे येथे आता २१ उमेदवार रिंगणात कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या आमदार प्रकाश डहाके यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम असल्यामुळे येथील लढत पंचरंगी होणार असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या जिल्हा परिषद सभापती हेमेंद्र ठाकरे यांनीही ऐनवेळी माघार घेतली आहे. रिसोड म तदारसंघात उमेदवारी दाखल केलेल्या ३२ उमेदवारांपैकी निम्म्या म्हणजेच १६ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे येथे १६ उमेदवार रिंगणात कायम आहेत. शिवसंग्रामच्या वतीने उमेदवारी दाखल केलेल्या दिलीप जाधव व विष्णुपंत भुतेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे येथे पंचरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.