शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वाशिममध्ये पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलरत्नांचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:45 IST

वाशिम : जलसंधारणाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जलरत्नांचा ५ आॅगस्ट रोजी येथील नियोजन भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलसंधारणाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जलरत्नांचा ५ आॅगस्ट रोजी येथील नियोजन भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटणी होते. आमदार अमित झनक, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, पाणी फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मयदादा फुटाणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती गणेशपुरे, तहसिलदार सचिन पाटील, डॉ. शरद जावळे, तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, शरद दहातोंडे, पवन मिश्रा, तालुका कृषि अधिकारी सचिन कांबळे, संतोष गवळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारंजा व मंगरुळपीर तालुक्यातील पाणी फाऊंडेशन, सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेणाºया मान्यवरांचा शाम सवाई, देवेंद्र राऊत, रविंद्र लोखंडे, अश्विन बहुरुपी, संदीप राऊत, वैभव किर्तनकर, आकाश उके, दिपक बकाल यांनी ग्रामगीता व वृक्षभेट देवून सत्कार केला. स्पर्धेत सहकार्य करणारे वॉटरहिरो म्हणून नीलेश सोमाणी, अविनाश मारशेटवार, सुखदेव इंगळे, रविंद्र इंगोले, केशवराव भगत यांच्यासमवेत कारंजा तालुक्यातील विळेगाव, बेलमंडळ, पिंपळगाव, बांबर्डा, काकडशिवणी, पोहा, दोनद बु., अनई, पिंप्री मोडक, धनज बु., शहादतपुर, जानोरी, धोत्रा जहांगीर, धोत्रा देशमुख, बेलखेड, झोडगा, ब्राम्हणवाडा, भुलोडा, कामठा, मंगरुळपीर तालुक्यातील नागी, जांब, मोहरी, पिंपळखुटा, लाठी, सायखेडा, शेंदुरजना मोरे, बोरव्हा, कोठारी, पार्डी ताड, तपोवन, कोळंबी, शेलगाव, वनोजा, दाभा, घोटा, धोत्रा, लखमापुर आदी गावातील सरपंच, कार्य करणारे समाजसेवक, अधिकारी, ग्रामसेवक, पुढारी, पदाधिकारी व विविध सामाजीक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटणी यांनी पाणी हे जिवन आहे, लोकप्रतिनिधीकडून जनतेने विकासाची अपेक्षा ठेवावी. विकासासाठी त्यांना वेळप्रसंगी वेठीस धरावे, असे आवाहन करीत भारतीय जैन संघटना व शासनाच्या वतीने यावर्षी वाशिम जिल्हा सुजलाम सुफलाम केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम सवाई, देवेंद्र राऊत, रविंद्र लोखंडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा