शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने आवळल्या वीजचोरट्यांच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 11:13 IST

MSEDCL News जिल्ह्यात आठवडाभरातच दहा लाखांची वीजचोरी पकडण्यात आली असून, संबंधितांना लाखो रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: विविध प्रकारे वीजचोरी करून महावितरणला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या वीजचोरट्यांविरोधात महावितरणकडून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात आठवडाभरातच दहा लाखांची वीजचोरी पकडण्यात आली असून, संबंधितांना लाखो रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून वीजचोरीचा प्रकार सुरू असल्याने महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महावितरणचा स्वतंत्र विभाग या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यरत असला तरी, अपेक्षित प्रमाणात वीजचोरीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. त्यामुळेच महावितरणकडून आता प्रत्येक वीज उपकेंद्रांतर्गत होणारी वीजचोरी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणचे पथक गावागावात फिरून वीजेचोरीचा शोध घेत आहे. त्यात गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात ५९३ वीजग्राहकांची तपासणी करण्यात आली असून, त्यात २१० ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे आढळून आले असून, वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणच्या पथकाने संबंधिताना जवळपास दहा लाख रुपयांचा दंड आकारला आहे.  

१६९ वीजजोडण्या खंडितवीजचोरीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत महावितरणचे कनिष्ठ अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाभरातील ५९३ वीजजोडण्यांची तपासणी केली असता त्यात २१० ठिकाणी वीजचोरीचा प्रकार होत असल्याचे आढळून आले. त्यापैकी १६९ ग्राहकांची वीजजोडणी महावितरणच्या पथकाने खंडित केली.

सेक्शन इंचार्जला महिन्यात २०० चोऱ्या पकडण्याचे उद्दिष्ट वीजचोरीवर आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ३२ सेक्शन इंचार्जना (कनिष्ठ अभियंता) महिन्याकाठी २०० चोऱ्या पकडण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सेक्शन इंचार्ज त्यांच्या पथकासह गावागावात भेट देऊन जोडण्यांची तपासणी करीत आहेत. 

जिल्ह्यात वीजचोरीचा प्रकार वाढला आहे. यामुळे महावितरणचे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याने वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. यात वीज जोडण्यांची तपासणी करून दोषी आढळलेल्या ग्राहकांवर वीज अधिनियमानुसार कारवाई केली जात आहे.-आर.जी. तायडे,कार्यकारी अभियंता, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण