शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

पोहरादेवी येथे रामनवमी साधेपणाने साजरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:46 IST

Ram Navami at Pohardevi : कोरोनामुळे यात्राैत्सवावर मर्यादा आल्याने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम २१ एप्रिल रोजी पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा) येथे दरवर्षी रामनवमी निमित्त आयोजित भव्य यात्रेला देशभरातील भाविकांची मांदियाळी असते. यंदा कोरोनामुळे यात्राैत्सवावर मर्यादा आल्याने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम २१ एप्रिल रोजी पार पडले. श्री संत सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महाराज यांनी सेवालाल महाराज मंदिरात तर गोर बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज व शेखर महाराज यांनी संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमात भाविकांविना धार्मिक विधी, पूजा अर्चना केली. रामनवमी निमित्त देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने जगदंबा देवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, संत डॉ रामराव महाराज, दानशूर संत बाबनलाल महाराज समाधी स्थळी माथा टेकवण्यासाठी येतात. मात्र यावेळी कोरोना महामारीचा प्रकोप वाढल्यामुळे शासनाने यात्रेवर बंदी आणली. वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी घरातच रामनवमी साधेपणाने साजरी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. व पोहरादेवी येथील संतमहंतांंच्या संमतीने यात्राैत्सव रद्द केल्यानंतर येथे भाविक येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली. २१ एप्रिल रोजी संत सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महाराज, संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमाच्या वतीने गोर बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी लाऊडस्पीकर वरून गावातील नागरिकांनी घरूनच दर्शन घेण्याची विनंती केली. यावेळी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करून कबीरदास महाराज यांनी जगद्गुरू संत सेवालाल महाराज मंदिरात व राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमात गोर बंजारा समाज बांधवांचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज व शेखर महाराज यांनी धार्मिक पूजा अर्चा करून आरदास म्हणून भोगभंडारा अर्पण करण्यात आला. यावेळी बाबूसिंग महाराज यांनी देशातील कोरोना महामारीचे संकट दूर करण्याची प्रार्थना जगदंबा देवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्याकडे केली. अनेक वर्षांपासून लाखोंच्या साक्षीने पार पडणारी ही यात्रा व भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणारा परिसर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे सामसूम होता.

टॅग्स :washimवाशिमRam Navamiराम नवमी