केनवड येथे आढळला काेराेनाबाधित
वाशिम : रिसाेड तालुक्यातील केनवड येथे १८ मार्च राेजी प्राप्त अहवालात एक जण काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहेत.
रिठद येथील ग्रामस्थ बिनधास्त
वाशिम : रिसाेड तालुक्यातील रिठद येथील ग्रामस्थ गावामध्ये काेराेना नियमांचे काेणतेही पालन न करता बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. गावात काेराेनाबाधितांची संख्या कमी असली तरी परिसरात काेराेनाबाधित असल्याने ग्रामस्थांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे बाेलल्या जात आहे.
रखडलेले काम मार्गी लावण्याची मागणी
वाशिम : रिसाेड शहरातील रखडलेल्या रस्ता कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे काम त्वरित मार्गी लावावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.