शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसैनिक धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 18:31 IST

वाशिम - शेतकºयांच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - शेतकºयांच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.जिल्हयात सन २०१८-१९ या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकºयांनी पेरलेल्या पिकांसाठी शेवटच्या दिवसात पाण्याची आवश्यकता होती. परंतु पावसाअभावी शेतातील सोयाबीन पिकांना परिपक्व अशा शेंगा भरल्या नाहीत. सोयाबीन पिक शेतकºयांंच्या हातातुन निसटुन गेले. यावर्षी अनेक शेतकºयांनी पिकविमा काढला असल्यामुळे सरकारी यंत्रणेने कार्यालयात बसून सर्वेक्षण न करता प्रत्यक्ष शेतात जावून शेतकºयांसमक्ष पिक कापणी सर्वेक्षण करावे. तसेच सन २०१७-१८ मधील काही पात्र शेतकºयांच्या पिक विम्याची रक्कम अद्यापही त्यांना देण्यात आली नाही. तालुक्यातील वाशिम, अनसिंग व वारला या मंडळातील शेतकºयांनी पिकविमा भरला. परंतु चुकीच्या सर्वेक्षणामुळे त्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ज्या पात्र परंतु अद्याप पिकविमा न दिलेल्या शेतकºयांना पिक विमा अदा करण्याचे निर्देश संबंधीत विमा कंपन्यांना देण्यात यावेत. शासनाने २४ जून २०१७ रोजी कर्जमाफी जाहीर केली होती. पात्र शेतकºयांना पिक कर्ज देणे क्रमप्राप्त होते. परंतु अनेक बँकांनी पात्र शेतकºयांना पिक कर्जाचे वाटप न केल्यामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

टॅग्स :washimवाशिमShiv Senaशिवसेना