शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा अंतिम निर्णयापर्यंत!

By admin | Updated: June 6, 2017 01:09 IST

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका पाहता त्यांना कर्जमुक्ती आवश्यक आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत तो संकटातून सावरल्या जाणार नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक असून, कर्जमाफी होईपर्यंत शिवसेनेचा लढा कायम राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते डॉ. सुभाष राठोड यांनी केले. ते मानोरा तालुक्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरणे कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी ५० हजार अर्ज शेतकऱ्यांचे भरल्या जाणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे.राज्यभर शिवसंपर्क अभियानाद्वारे शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीचे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. शिवसेनेच्यावतीने जिल्हा, तालुका स्तरावर तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, सर्कलप्रमुखांकडून जिल्हा परिषद सर्कलनिहाय अर्ज भरुन घेण्यास सुरुवात केली आहे. मानोरा तालुक्यात डॉ. सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेस सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवसेना तालुकाप्रमुख रवी पवार यांनी इंझोरी जिल्हा परिषद सर्कलमधील इंझोरी, मसणी, जामदरा, दापुरा बु., दापुरा खुर्द, चौसाळा, तोरनाळा, उमरदरी येथील शेतकऱ्यांचे अर्ज भरुन घेतले आहेत. यावेळी छोटेखानी कार्यक्रमात डॉ. सुभाष राठोड यांनी शिवसेना पक्ष सत्तेत असला, तरी २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करीत असल्यामुळे सामाजिक जबाबदारीतून शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय तो सुखी होऊन शकत नसल्याचे म्हटले. तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज भरून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. याकरिता तालुक्यातील सर्वच शिवसैनिक प्रयत्नशील असल्याचे शहरप्रमुख राजु देशमुख, डॉ. श्याम जाधव, उपप्रमुख डॉ. करसडे यांनी कळविले आहे.--