शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

शिरपूर: विद्यार्थ्यांना नियमित योगाचे धडे देणारी जिल्हा परिषदेची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 12:05 IST

शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह मुलींना नियमितपणे योगचे धडे देण्याचे काम शाळेचे शिक्षक करीत असून तरही शाळा या शाळेची प्रेरणा घेतांना दिसून येत आहेत.

वाशिम - शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह मुलींना नियमितपणे योगचे धडे देण्याचे काम शाळेचे शिक्षक करीत असून तरही शाळा या शाळेची प्रेरणा घेतांना दिसून येत आहेत. मालेगाव तालुक्यातील शिरपुर जैन येथील १०० टक्के डिजीटल असलेली जि.प.कन्या शाळा आहे. या शाळेत एकुण १५१ मुली, पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापक आशा नागपुरकरसह शिक्षकांच्या पुढाकाराने खर्च करुन  व लोकवर्गणी करुन जानेवारी २०१७ शाळा  संपूर्णपणे डिजीटल करुन घेतली. त्याचा मोठा फायदा शिक्षण घेणाºया मुलींना होत असल्याचे दिसत आहे.  जीवनात योगाचे महत्व पाहता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यासाठी मुख्याध्यापकासह शिक्षकांची सकारात्मक चर्चा झाली. चर्चेनंतर योगाचे धडे विद्यार्थ्यांना कोण देणार यावर मंथन झाले असता अनेक शिक्षक स्वत: योगा करीत असल्याने  त्याची संपूर्ण माहिती त्यांना दिसून आली. योगाबाबत परिपूर्ण ज्ञान अवगत करुन शिक्षकांनी योगा शिकवण्याचे कार्य हाती घेतले. आज शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना केवळ योगाचे नाव घेवून योगा करण्याचे सांगितल्याबरोबर एकतालात सर्वजण योगा करतांना दिसून येत आहे. या शाळेतील या उपक्रमाची माहिती जिल्हयातील ईतर शाळांना मिळाल्याने अनेक शाळेतील शिक्षकांनी भेटी देवून योगा पध्दत व ते राबविण्याची पध्दत सुध्दा जाणून घेतली. या एकमेव शाळेमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिल्या जात असल्याने ईतरही शाळेत या शाळेचा आदर्श घेवून लवकरात लवकर योगाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक रवि बालटकर, हरिश्चंद्र लवटे, विजय अवचार, स्वाभीमान व्यवहारे,  पंडीतराव सरनाईक, रुपाली पुरोहीत हे शिक्षक   मुलींना शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्तीसाठी नियमितपणे योगाचे धडे देण्याचे काम करीत आहे. एकेकाळी शिक्षणाच्या जीव छोट्या स्पर्धेमुळे ओस पडणाºया जि.प.शाळा आता शिक्षणासह विविध उपक्रमामुळे पुन्हा गजबजल्या आहेत.

आमच्या जिल्हा परिषद कन्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या जवळपास सर्वच मुली हया कष्टकरी, कामकरी, मजुर कुटुंबातील आहेत. त्यांना योग्य शिक्षण व आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवून त्यांच्यामध्ये शाळेची ओढ कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातीलच एक भाग योगाचे धडे असून गत तीन ते चार वर्षांपासून सतत हा उपक्रम सुरु असून विद्यार्थ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. - आशा नागपूरकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद कन्या शाळा शिरपूर