शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जैन : हायड्रोकार्बन तपासणीचा फटका शेतकर्‍यांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:06 IST

देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्‍यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि इतर साहित्यामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसानभरपाईपोटी दिला जातोय नगण्य मोबदला 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्‍यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि इतर साहित्यामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीसाठी प्रशासनाकडून मोबदला दिला जात असला तरी, तो अतिशय नगण्य असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे.  देशातील गाळयुक्त खोर्‍यात हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता तपासण्यासाठी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे. या साठी अल्फा जीओ इंडिया या संस्थेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडे सहकार्य करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सूचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांकडून सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठय़ांना संबंधित संस्थेला त्यांनी निश्‍चित केलेल्या जागेवर सर्वेक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रक्रियेला मालेगाव तालुक्यात प्रारंभ झाला आहे. गेल्या ८ ते १0 दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत हरभरा, गहू ही पिके असलेल्या शेतातून खोदकामाचे साहित्य आणि वाहने नेण्यात येत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला दिला जात असला तरी, झालेल्या नुकसानाच्या तुलनेत तो खूप कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सद्यस्थितीत मिर्झापूर, पांगरखेडा शिवारात हे काम सुरू असून, नुकसानापोटी मिळालेल्या तुटपुंज्या मोबदल्याची माहिती शेतकर्‍यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनाही दिली आहे. 

हायड्रोकार्बन साठय़ाच्या तपासणीसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि खोदकामाचे साहित्य शेतातून फिरविण्यात येत आहे. त्यामुळे तूर, हरभरा, गहू या पिकांचे मोठे नुकसान होत असून, या नुकसानापोटी मिळणारा मोबदला नगण्य आहे. नुकसानाचे प्रमाण लक्षात घेऊनच प्रशासनाने शेतकर्‍यांना मोबदला द्यावा.                                                       -अर्जुना सोमटकर,  शेतकरी, मिर्झापूर

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती