शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जैन: अतिक्रमणातील मालमत्ता मोजणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:02 IST

गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी मालमत्ता मोजणीची मोहिम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देभूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने मालमत्तांची मोजणी करण्यात येत आहे.ही मोहिम पाहण्यासाठी नागरिकांची ठिकठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: तीर्थक्षेत्र विकासांतर्गत मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैनचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या अंतर्गत तब्बल दोन महिन्यांनी गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी मालमत्ता मोजणीची मोहिम राबविण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी पावसामुळे खोळंबलेली ही मोहिम पुन्हा सुरू झाली असून,  भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने मालमत्तांची मोजणी करण्यात येत आहे. ही मोहिम पाहण्यासाठी नागरिकांची ठिकठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने प्रशासनाला अडथळा निर्माण होत आहे. मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथील अतिक्रमण हटविण्यास होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची नोटीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली. त्यानुसार, आता अतिक्रमण हटविण्याची हालचाल गतीमान झाली असून बुधवारी भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्यांची मोजणी करण्यास ८ दिवसांपूर्वी सुरुवात झाली. मध्यतंरी पावसामुळे खोळंबलेली ही मोहिम आता पुन्हा सुरू झाली आहे. शिरपूर हे पर्यटनक्षेत्र आहे. येथे येणाºया पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. या भाविकांना रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाचा मोठा त्रास होतो. ते हटविण्यास कुणीही धजावत नव्हते. दरम्यान, मो. इमदाद बागवान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याविषयी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेवर २१ फेब्रुवारी रोजी निकाल देताना एका महिन्यात अतिक्रमण काढून शिरपूर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्यासंबंधी वन आणि महसूल विभागाच्या प्रधान सचिवांसह जिल्हाधिकारी, तहसिलदार व सरपंचांना नोटिस बजावण्यात आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासंदर्भातील प्रक्रियेस सुरूवात केली आहे. त्यानुसार, २५ जुलै रोजी भूमि अभिलेख कार्यालयाच्या विशेष पथकाने शिरपूरात हजेरी लावून प्रत्यक्ष मोजणीस प्रारंभ केला. ही मोहिम पावसामुळे खोळंबली होती आता  पुन्हा ही मोहीम सुरू केली असून, मोजणीची प्रक्रिया पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत असल्याने प्रशासनाला अडथळे येत आहेत.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन