शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिरपूर परिसरातील ७०० थकबाकीदार शेतक-यांची विज जोडणी खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 19:59 IST

सुल्तानी वसुली अंतर्गत एकट्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरातील गावच्या ७०० हून अधिक शेतक-यांच्या विज जोडण्या रविवार २९ आॅक्टोबर रोजी खंडीतही करण्यात आल्या. त्यामुळे शेतक-यांचा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. 

ठळक मुद्देरब्बी हंगामावर संकटविजवितरणची सुल्तानी वसुलीपद्धत

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: रब्बी हंगाम आता सुरू झाला असताना विजवितरणकडून थकबाकी वसुलीच्या नावाखाली विजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या सुल्तानी वसुली अंतर्गत एकट्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरातील गावच्या ७०० हून अधिक शेतक-यांच्या विज जोडण्या रविवार २९ आॅक्टोबर रोजी खंडीतही करण्यात आल्या. त्यामुळे शेतक-यांचा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील ५३ हजार ७७९ ग्राहकांकडे असलेली ३१६ कोटी ७६ लाखांची थकबाकी वसुल करण्यासाठी फायदा घेण्याचे ठरविले आणि एप्रिल ते जुलै २०१७ हे त्रैमासिक चालू देयक त्वरीत भरण्याचे शेतकºयांना सांगण्यात आले आहे. हे देयक अदा न केल्यास विज पुरवठा तात्काळ खंडीत करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. याच मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शिरपूर जैन परिसरातील ७०० ते ८०० शेतकºयांच्या कृषीपंपांची जोडणी रविवार २९ आॅक्टोबर रोजी खंडीतही करण्यात आली. वाघी, बोराळा, शेलगाव खवणे, खंडाळा, ढोरखेडा, कोठा आदि गावांतील शेतकºयांच्या कृषीपंपासाठी खंडाळा ३३ केव्ही वीज उपकेंद्रांवरून शिरपूर फिडरद्वारे होणारा वीज पुरवठाच विज वितरणच्या अधिकाºयांनी बंद केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील नुकताच उगवलेले हरभरा पीक संंकटात आले असून, पेरलेले गह, ज्वारीचे बियाणे उगवेल की नाही, ही भिती निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Power Shutdownभारनियमन