शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेलु तडसे  येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:43 IST

वाशिम : तालुक्यात येणाऱ्या शेलु तडसे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ईमारत मागील दोन वर्षांपासून नव्याने तयार असून कर्मचाऱ्याअभावी मात्र ही ईमारत शोभेची वास्तू बनलेली आहे. कर्मचारीच नसल्याने हे उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद आहे.

ठळक मुद्देसदर उपकेंद्राची इमारत उच्च दाब विद्युत वाहिनी खाली तयार केल्यामुळे सदर ईमारतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या उपकेंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्ची घालून दोन वर्षापूवी ईमारत बांधण्यात आली. उपकेंद्र तात्काळ सुरु करावे अशी मागणी निवेदनाव्दारे शेलुच्या सरपंच तृष्णा देवानंद गुळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

 

वाशिम : तालुक्यात येणाऱ्या शेलु तडसे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ईमारत मागील दोन वर्षांपासून नव्याने तयार असून कर्मचाऱ्याअभावी मात्र ही ईमारत शोभेची वास्तू बनलेली आहे. कर्मचारीच नसल्याने हे उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. तसेच सदर उपकेंद्राची इमारत उच्च दाब विद्युत वाहिनी खाली तयार केल्यामुळे सदर ईमारतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे मात्र आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. 

शेलु तडसे येथे १५०० ते २००० लोकसंख्या आहे. येथे नेहमी साथीचे रोग बळावतात त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच जवळपासच्या गावाला आरोग्य सुविधा तातडीने जागीच मिहावी याकरिता जिल्हा परिषद सदस्य नथ्थुजी कापसे यांनी पुढाकार घेवून सदर आरोग्य उपकेंद्रमंजुर करुन घेतले होते. या उपकेंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्ची घालून दोन वर्षापूवी ईमारत बांधण्यात आली. परंतु संबधित बांधकाम यंत्रणेच्या ले-आऊट देणाºया इंजिनियर तथा संबंधित ठेकेदाराच्या अक्षम्य चुकीमुळे , हलगर्जीपणामुळे सदर इमारत ही विद्युत कंपनीच्या उच्च दाब वाहिनी खाली उभ्ज्ञारण्यात आल्याने सदर ईमारत सदैव धोक्यात आली आहे. येथे विद्युत अपघात होवून जिवित्वास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सदर इमारतीमध्ये विद्युत पुरवठा अद्याप घेतला नसून या ईमारतीमध्ये कामकाज सुरु होण्यापूर्वी खिडक्या, दाराच्या काचा फुटल्या असून ईमारतीची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निष्पन्न होते. सदर उपकेंद्राकरीता तरतूद असतांना ईनव्हरटर लावलेले नाही.तसेच या आरोग्य उपकेंद्राकरीता एक आरोग्य सेवक, दोन आरोग्यसेविका, एक शिपाई असे पदभरती पाहिजे, परंतु ही पदभरती न केल्यामुळे हे आरोग्य उपकेंद्र बंद आहे. याकरिता पदभरती करावी असा प्रस्ताव वारला प्रा.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शामला सुडे यांनी शासनाकडे पाठविला आहे. तसेच पदभरती करुन शेलु आरोग्य उपकेंद्र तात्काळ सुरु करावे अशी मागणी निवेदनाव्दारे शेलुच्या सरपंच तृष्णा देवानंद गुळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. तसेच सदर उपकेंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केल्या जात आहे.

आपण वार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत येणाऱ्यां शेलु  (तडसे) प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकरिता कर्मचाºयांची मागणी दोन तीन वेळा वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करुन केली आहे. तसेच तात्पुरते कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. 

- शामला सुडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वार्ला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद