शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मालेगावातील शौर्य शंभूच्या शिलेदारांच्या कार्याची दखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:47 IST

मालेगाव : विदर्भातील दुर्लक्षीत असलेल्या गाविलगड येथील किल्ल्यासह इतर गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी मालेगाव येथील शौर्य शंभू संघटनेने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देकिल्ल्याची माहिती शासनाकडे देण्याचे महत्वाचे काम शौय शंभूच्या शिलेदारांनी केले आहे. त्याची दखल पुरातत्त्व विभागाने घेतली आणि शौर्य शंभूच्या कार्यात सक्रिय सहभागही नोंदविला. येत्या आॅगष्ट महिन्यात पुन्हा शौर्य शंभूची मोहिम आखण्यात येणार असल्याचे प्रा. रवि बाविस्कर यांनी सांगितले.

मालेगाव : विदर्भातील दुर्लक्षीत असलेल्या गाविलगड येथील किल्ल्यासह इतर गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी मालेगाव येथील शौर्य शंभू संघटनेने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत त्यांनी राज्यातील किल्याची स्वछता मोहीम हाथी घेतली आहे. याची दखल पुरातत्व विभागाने घेतली असून, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी कळविले असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख प्रा. प्रकाश कापुरे यांनी दिली आहे.गाविलगड हा विदर्भातील अतिशय  दुर्लक्षित किल्ला असून, या किल्ल्याची माहिती शासनाकडे देण्याचे महत्वाचे काम शौय शंभूच्या शिलेदारांनी केले आहे. गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याच्या मोहिमेंतर्गत त्यांनी सर्वप्रथम गाविलगडच्या किल्ल्याची पाहणी केली. यासाठी मोहिम आखून तेथे स्वच्छता केली, तसेच दुर्लक्षीत भागाची माहिती शोधून काढत. पुरातत्त्व विभाग आणि शासनाकडे या संदर्भात पत्र व्यवहार केला. त्याची दखल पुरातत्त्व विभागाने घेतली आणि शौर्य शंभूच्या कार्यात सक्रिय सहभागही नोंदविला, तसेच पुढे या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. या मोहिमेत रखरखत्या उन्हात गडावर जमलेला घाणकचरा साफ करण्यात आला. यादरम्यान शौर्यशंभूचे शिलेदार आणि पुरातत्त्व विभागाने किल्ल्यावरील विविध भागांच्या छायाचित्रांची प्रदर्शनी भरविली.  या प्रदर्शनीला लाभ परिसरातील नागरिक आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही बाब केंद्र आणि राज्य सरकार च्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या गाविलगड किल्ल्यासाठी आणखी काय करता येईल. त्याची योजना आखण्याचे ठरले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. प्रकाश कापुरे, प्रा. रवि बाविस्कर, प्रा. संतोष उगले, अनिल सोळंके, निखिल गोरे, किरण जिरवणकर, शिवाजी नायक, बाळासाहेब पारडे, यश इंगोले यांच्या केंद्रीय पुरातत्त्व विभाग नागपूरचे उपअधिक्षक इजहार हाश्मी, मिलिंद विष्णूपंत अंगाईतकर, पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शन शिल्पा जमगडे यांची चमू उपस्थिती होती. येत्या आॅगष्ट महिन्यात पुन्हा शौर्य शंभूची मोहिम आखण्यात येणार असल्याचे प्रा. रवि बाविस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव