कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील शेवती येथील आनंद नावाच्या नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी आपल्या राहत्या गावी जलसंधारणाच्याा कामाकरिता २१ एप्रिल रोजी गावकरी व प्रशासकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यासमवेत श्रमदान करुन आपल्या लग्नासाठी मार्गक्रमण केले.महाराष्ट्रातील संभाव्य पाणी टंचाई दूर करण्याच्या हेतुने सिने अभिनेता अमिर खान यांनी पुढाकार घेवुन व महाराष्ट्र शासनाला विश्वासात घेवुन पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. गावातील जलस्त्रोताची खोलीकरण करुन पाणी साठा वाढविण्यासाठी वॉटर कप स्पर्धेंतर्गत मागील वर्षी राज्यातील दहा तालुक्यात जलसंधारणााची कामे केली.याच वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्यात यावर्षी राज्यातील ३० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याकरिता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून शासन व प्रशासनाच्या प्रत्येक घटकासहीत गावकरी मोठ्या संख्येने जलसंधारणाच्या कामाकरिता श्रमदान क रीत आहे. शेवती येथील रहिवासी विलास देवळे यांचे चिरंजीव आनंद याचा शुभविवाह वाशिम तालुक्यातील वाघदाडी येथील विश्वनाथ वानखडे यांच्या सपना नावाच्या कन्येशी २१ एप्रिल रोजी ठरला असतांना केवळ १० वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आनंदने आपल्या गावातील पाणी समस्या दुर करण्यासाठी लग्नाला जाण्याआधी श्रमदान करुन लग्नापेक्षाही जलसंधारणाचे कामे महत्वाचे हे त्याने आपल्या कृतीतुन गावकऱ्यांना पटवुन दिले. यावेळी कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी.पवार,विस्तार अधिकारी साई चव्हाण, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी जलसंधारणासाठी केले श्रमदान
By admin | Updated: April 22, 2017 18:29 IST