लोकमत न्यूज नेटवर्कमालेगांव : विदभार्चे आराध्य दैवत असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता डव्हा येथे आगमन झाले असता जोरदार स्वागत करण्यात आले.मेडशी येथून पालखी सुकांडा येथे आली त्यावेळी सुकांडा येथील गजानन महाराज मंदिराच्या वतीने पालखिचे स्वागत करण्यात आले त्यांनतर पालखी कुरळा येथे आली असता चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती . सुकांडा येथील सरपंच अलका सुनीलराव घुगे यांनी स्वागत केले .त्यानंतर डव्हा येथे संस्थानच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. ७ जून रोजी पालखी मालेगावात येणार असून भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
शेगाविचा राणा नाथांच्या भेटीला
By admin | Updated: June 6, 2017 19:41 IST