शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती

By admin | Updated: July 4, 2017 02:25 IST

रिसोड तालुक्यातील घटना : स्त्री रुग्णालयात घटना उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : युवकाने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याने मुलीला गर्भधारणा झाल्याची घटना सोमवारी दुपारी जिल्हा स्त्री रुग्णालयात उघडकीस आली. ही घटना रिसोड तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी आरोपीसह मुलीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला. सोमवारी दुपारी रिसोड तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय मुलगी गर्भपात करण्यासाठी अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गर्भलिंग निदान कायद्यानुसार पाच महिन्यांचा गर्भ काढता येत नसल्याचे मुलगी व तिच्या कुटुंबीयांना सांगितले आणि घटनेची माहिती घेतली. स्त्री रुग्णालयाने मुलीला तक्रार देण्यास रामदासपेठ पोलीस ठाण्यात पाठविले. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती दहावीत शिकते. तिची मैत्रीण वर्षा लक्ष्मण खांदळे हिच्या ओळखीतील विश्वजित सुखदेव जुमडे (२१) याच्यासोबत तिची भेट झाली. विश्वजित जुमडे हा शाळा परिसरात येऊन पीडित मुलीसोबत बोलू लागला. संपर्क वाढला. २६ फेब्रुवारी २0१७ रोजी मैत्रीण वर्षा खांदळे ही तिच्या घरी आली. माझ्या घरी कोणी नसल्याचे सांगून तिने पीडित मुलीला तिच्या घरी नेले. या ठिकाणी आधीपासूनच विश्वजित जुमडे हजर होता. त्याने घरातील स्वयंपाक खोलीत नेल्यावर वर्षा खांदळे ही घराबाहेर गेली. यावेळी विश्वजित याने बळजबरीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यातून मुलीला गर्भधारणा झाली. समाजात बदनामी होईल, या भीतीने मुलीने व तिच्या कुटुंबीयांनी ही घटना कोणालाच सांगितली नाही; परंतु मुलीचा गर्भपात करण्यासाठी अकोल्यातील स्त्री रुग्णालयात आल्याने ही घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी विश्वजित जुमडे, वर्षा खांदळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (३४), बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.