शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत सात सापांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST

वाईल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन टीमच्या सदस्यांनी गत महिनाभरात ८२ सापांना जीवदान देण्याचे कार्य केले. आता त्यात आणखी सात सापांची भर ...

वाईल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन टीमच्या सदस्यांनी गत महिनाभरात ८२ सापांना जीवदान देण्याचे कार्य केले. आता त्यात आणखी सात सापांची भर पडली आहे. या टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी कोलार, पेडगाव, मंगरूळपीर, चिस्ताळा, गोगरी आणि मानोरा येथे आढळून आलेल्या सापांना सुरक्षित पकडत जंगलात सोडले. यात मण्यार जातीच्या दोन विषारी सापांसह डुरक्या घोणस, कवड्या आणि पानदिवड जातीच्या बिनविषारी सापांचा समावेश होता.

अतुल डापसे, नंदू सातपुते, बुद्धभूषण सुर्वे, अनिकेत इंगळे, कीर्तिराज भगत, अक्षय इंगळे, वैभव सुर्वे, अजय डांगे, राहुल साखरे, प्रतीक टोंचर, विष्णू गावंडे, प्रवीण अंबोरे, उमेश जंगले, आदी सर्पमित्रांनी जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात हे साप पकडले. या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.

-----------------

साप आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन

मंगरूळपीर, मानोरा तालुक्यांसह इतर ठिकाणी मानवी वस्तीत साप आढळून आल्यास लोकांनी सापाला न मारता आणि न डिवचता वाईल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन टीमचे सर्पमित्र अथवा परिसरातील इतर कोणत्याही सर्पमित्रांना याबाबत माहिती द्यावी आणि सापांचा जीव वाचविण्यासह जैवविविधता टिकविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक तथा पर्यावरण अभ्यासक गौरवकुमार इंगळे, वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन टीमचे अध्यक्ष श्रीकांत डापसे आणि उपाध्यक्ष आदित्य इंगोले यांनी केले आहे.