शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

यवतमाळातील सात ठार

By admin | Updated: May 26, 2014 01:43 IST

दोन अपघात मुंबईकडे जाताना वाशिम येथे मायलेकांसह तिघांचा मृत्यू

वाशिम : वास्तुशांती व लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी वाशिम तालुक्यातील टनका या गावी आलेले मुंबई येथील जोगेश्‍वरी भागातील एका कुटुंबीतील सदस्य मुंबईस परतण्यासाठी वाशिमकडे येत असताना त्यांची टोयाटो क्वॉलीस जीप रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये मायलेकीसह तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये तीन बालकांसह १0 जणांचा समावेश आहे. ही घटना वाशिम ते हिंगोली महामार्गावरील तोंडगाव फाट्यानजीक २४ मेच्या उत्तररात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये सिंधू डिगांबर भालेराव, वैष्णवी डिगांबर भालेराव (माय-लेकी) व वसंत योगीराज कांबळे या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये सुवर्णा वसंत कांबळे, प्रणिता विजय इंगोले, गुंजन विनोद राऊत, सचिन वसंत कांबळे, स्नेहा वरुण कांबळे, तन्वी विनोद राऊत, वेदांत विनोद इंगोले, विनोद धोंडबा राऊत व वाहन चालक विजय देवीदास इंगोले यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे वास्तव्य असलेले डिगांबर रामा भालेराव यांचे कुटुंब गेल्या १५ ते २0 वर्षांंंंपासून जोगेश्‍वरी वेस्ट मुंबई येथे वास्तव्य करीत आहेत. वाशिम तालुक्यातील सोंडा व टनका येथे वास्तुशांती व लग्नसमारंभाच्या निमित्ताने भालेराव, इंगोले, राऊत व कांबळे कुटुंब आले होते. यामध्ये डिगांबर रामा भालेराव, त्यांच्या पत्नी सिंधू डिगांबर भालेराव, मुलगी वैष्णवी डिगांबर भालेराव (१४), वसंत योगीराज कांबळे (३६), सुवर्णा वसंत कांबळे (२८), प्रणिता विजय इंगोले (२५), गुंजन विनोद राऊत (३0), सचिन वसंत कांबळे (१५), स्नेहा वरुण कांबळे (९), तन्वी विनोद राऊत (४), वेदांत विनोद इंगोले (३), विनोद धोंडबा राऊत व वाहन चालक विजय देवीदास इंगोले (२८) यांचा समावेश आहे. हे कुटुंब मुंबईहून वाशिमला १७ मे रोजी आले होते. या कुटुंबाने नातेवाईकाकडील वास्तुशांती व लग्नसमारंभाचे कार्यक्रम आटोपले. आपल्या नातेवाईकाकडील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर वाशिम तालुक्यातील टनका येथून २४ मे रोजी रात्री २ वाजता मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाले. परतीच्या प्रवासाला वाशिमकडे येत होते. दरम्यान, तोंडगाव फाट्याजवळ रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत सीजी 0७ सीए 0८६७ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकला रिफ्लेक्टर व इंडिकेटर नसल्याने वाहनचालक विजय इंगोले याला ट्रक दिसला नाही. भरधाव वेगात असलेली क्वॉलीस जीप उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की क्वॉलीस जीपचा अक्षरश: चुराडा झाला.