वाशिम : सेवाज्येष्ठतेच्या नियमाला डावलून कनिष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्याचा, स्थानिक नगर परिषद महात्मा गांधी विद्यालयातील प्रकार एका तक्रारीने समोर आणला आहे. विशेष म्हणजे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनीदेखील प्रभारी मुख्याध्यापक पदाबाबतचे न.प.चे आदेश चुकीचे ठरविले आहेत. तरीदेखील नगर परिषद आपल्याच निर्णयावर ठाम असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय वाशिम येथे सेवाज्येष्ठतेनुसार कुतुबुद्दीन ताजी, चंदा हंबीर, तनवीर साजिद सुफी, गोविंद राऊत, तु.प्र. गावंडे अशा क्रम लागतो. ३१ ऑक्टोबर २0१३ ला तत्कालीन मुख्याध्यापक सेवानवृत्त झाले. रिक्त झालेल्या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती देणे अपेक्षीत होते. ताजी व सुफी सेवानवृत्त झाल्याने चंदा हंबीर या तीन क्रमांकाच्या सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे प्रभार येणे अपेक्षीत होते. मात्र, हंबीर प्रभार घेण्यास इच्छूक नसल्याचे निवेदनात नमूद करून गोविंद राऊत यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार येणे अपेक्षीत होते. मात्र, सेवाज्येष्ठता यादीत १५ व्या क्रमांकावर नाव असलेल्या शिक्षकाकडे प्रभार देण्यात आला आहे, असे राऊत यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकाराला राऊत यांनी आक्षेप घेत नगर परिषद व शिक्षणाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे वस्तुस्थिती मांडली आहे. वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी वंसत इंगोले यांनी नियमानुसार कार्यवाही करून कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले.
सेवाज्येष्ठता नियमाला नगर परिषद प्रशासनाचा कोलदांडा
By admin | Updated: September 26, 2014 23:42 IST