शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

१५-२० वर्षे सेवा दिली; केंद्रप्रमुखपदी पदोन्नती केव्हा?; शिक्षक संघटना आक्रमक

By संतोष वानखडे | Updated: January 10, 2024 17:54 IST

विविध प्रश्न प्रलंबित

वाशिम : शैक्षणिक क्षेत्रात १५ ते २० वर्ष सेवा दिली, त्याऊपरही केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षक ) पदावर पदोन्नती मिळाली नसल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या. बुधवारी (दि.१० ) शिक्षक कृती समितीच्यावतीने वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

१२ जानेवारी २०२४ रोजी मॉ जिजाऊ जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांना व प्राथमिक शिक्षकांना  जयंतीनिमित्त प्रत्यक्ष सिंदखेडराजा येथे उपस्थित राहता येईल व मानवंदना देता येईल तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा माँ जिजाऊ जन्मस्थळाची माहिती होईल. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना त्वरित लागू करावी, थकित बिलाचे एरियर्स, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या, वैद्यकीय परिपूर्ती देयके इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन व माँ जिजाऊ जयंती निमित्त सुट्टी देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी शिष्टमंडळाला दिली. शिस्टमंडळात वाशिम जि.प.शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय इढोळे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर, संचालक रा.सु.इंगळे जगन्नाथ आरु, प्रशांत वाझुळकर, अजयकुमार कटके ,संतोष बांडे ,किशोर जुनघरे ,पुरुषोत्तम तायडे, छत्रगुघ्न गवळी, संतोष खोडे, सुनील इंगोले, चंद्रमनी इंगोले, गजानन शेळके, राष्ट्रवादी शिक्षक संघटना व अखिल भारतीय शिक्षक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिम