वाशिम : खुनासारख्या गंभिर गुन्ह्यापासून ते अगदी साखळी चोरीपर्यंत आणि सायबर गुन्ह्यापासून आर्थिक फसवणकीच्या बहुतेक घटनांमध्ये जेष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचो दिसते. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २00७ पासून एक हजार ६७९ जेष्ठ नागरिकांचे खून झाले ओहेत. या प्रकाराच्या गुन्ह्यांच्या यादीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असुन वाशिम जिल्ह्यातही विविध गुन्ह्यांमध्ये जेष्ठ नागरिकांना टार्गट केले जात असल्याचा उल्लेख अहवालात केलेला आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करणारे सराईत गुन्हगार नसून सुशिक्षीत व नात्यातीलच व्यक्ती असल्याची बाब समोर येत आहे. झटपट श्रीमंतीच्या मोहाने आर्थिक गुन्हेगारीच्या विळख्यात सापडणार्या सुशिक्षितांच्या गुन्हेगारीत महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात १४0 टक्यांनी वाढ झाली असुन या गुन्हेगारांचे साफ्ट टार्गेट ज्येष्ठ नागरिक ठरताहेत. परिणामी त्यांच्या सुरक्षैबाबत गांभिर्याने पावले उचलणे गरजेच झाले आहे.
ज्येष्ठ नागरिक ठरताहेत गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट
By admin | Updated: May 31, 2014 00:51 IST