शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरिय सायकलींग स्पर्धेकरिता निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 14:17 IST

वाशिम : सायकलिंग असोशिएशन आॅफ महाराष्टÑ यांचे मान्यतेने सालेकसा जि. गोंदीया येथे ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरिय रोड सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सायकलिंग असोशिएशन आॅफ महाराष्टÑ यांचे मान्यतेने सालेकसा जि. गोंदीया येथे ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरिय रोड सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता वाशिम जिल्हयाचा संघ निवडण्याचे दृष्टीने वाशिम जिल्हा सायकलिंग असोशिएशनच्यावतिने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन ६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून राज्यस्तरिय रोड सायकलिंग स्पर्धेकरिता सहभागी होणाऱ्या वाशिम जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता वयोगट ठरविण्यात आले असून यामध्ये पुरुष व महिला १९ ते ३५ वर्षाआतील, सिनिअर मुले मुली १९ वर्षाआतील, ज्युनिअर मुले-मुली १८ वर्षाआतील, सबज्युनिअर मुले-मुली १४ वर्षाआतील तसेच बनावटीच्या सायकलीच्या स्पर्धेसाठी पुरुष १९ ते ३५ वर्षाआतीलचा समावेश राहिल. सदर जिल्हास्तरिय स्पर्धा प्रत्येक वयोगटासाठी विविध अंतरासाठी असणार आहे. प्रत्येक गटातून प्रथम, व्दितीय क्रमांकाच्या खेळाडुची राज्यस्तरिय रोड सायकलिंग स्पर्धेकरीता निवड होणार आहे. तरी इच्छूक सायकलपटू व सायकल क्लबनी वयाचा दाखला, दोन रंगीत फोटो तसेच दहावी , बारावीत शिकत असलेल्या सायकलपटुंनी गुण सवलतसाठी आपल्या शाळेचे बोनाफाई प्रमाणपत्र घेवून उपस्थित रहावे. स्पर्धेकरिता स्वत:ची सायकल व हेलमेट असणे आवश्यक आहे. तरी इच्छूक सायकलपटुंनी निवड चाचणी स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन सायकलिंग असोशिएशन आॅफ महाराष्टÑचे उपाध्यक्ष धनंजय वानखेडे व वाशिम जिल्हा सायकलिंग असोशिएशनचे सचिव अनिल देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमCyclingसायकलिंग