शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:55 IST

वाशिम :  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार १५ जुलै २०१९ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तींने या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी २० व २१ जुलै आणि २७ व २८ जुलै २०१९ रोजी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ५ आॅगस्ट २०१९ पर्यंत पर्यवेक्षक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार नोंदणी अधिका?्यांद्वारे तपासणी होईल. १३ आॅगस्ट २०१९ पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. १६ आॅगस्ट २०१९ पर्यंत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मतदार यादी निरीक्षक यांच्याद्वारे मतदार यादीची विशेष तपासणी करून डाटाबेसचे अद्यावतीकरण व पुरवणी याद्यांची तपासणी केली जाईल. त्यांतर १९ आॅगस्ट २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले.मोहीम कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे, मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठीचे अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांकडे सादर करता येतील. तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी, २० व २१ जुलै आणि २७ व २८ जुलै २०१९ रोजी राबविल्या जाणाºया विशेष मोहीम कालावधीत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहून हे अर्ज स्वीकारतील. तहसीलदार कार्यालयात सुध्दा हे अर्ज सादर करता येतील. या अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत, असेही जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग