शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यातील कामगारांचे लोंढे परप्रांताकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:47 IST

रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याचे दिसते; परंतु विविध नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला. रब्बीतही भारनियमनाचा खोडा असल्याने शेतीची कामे मिळेनासी झाली, तर रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात रोजगाराचा सर्वात मुख्य मार्ग हा शेतीवर आधारित आहे. उद्योग धंद्यांचा अभाव, विकासाची संथगती आदिंमुळे इतर कामांची उपलब्धताही नाही. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने खरीप हंगामावरच शेतकरी आणि शेतमजुरांची भिस्त असते. जिल्ह्यात पावसाची अनियमितता नेहमीच पाहायला मिळते. त्यातच विविध नैसर्गिक संकटांचा परिणाम शेतीपिकांवर होतो. त्यामुळे उत्पादनात सातत्याने घट होत आहे. याचा परिणाम शेतीश्ी निगडित उद्योगधंद्यांवर होतो. त्यामुळेच खरीप हंगाम संपला की, जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होतो. यंदाही ही स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप हंगामाला बसल्यानंतर रब्बी हंगामात भारनियमनाचा खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतीमधील कामे बंद पडली असून, शेतीवर अवलंबून असलेले कामगार रोजगारासाठी परप्रांतात धाव घेत आहेत. मानोरा तालुक्यातील अनेक गावे यामुळे निम्म्याहून अधिक रिकामी झाली असताना आता इतरही तालुक्यातील शेतमजूर कुटुंबासह परप्रांतात कामाच्या शोधात स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोगलदरी परिसरातील शेकडो घरांना टाळेमंगरुळपीर तालुक्यात खरीप हंगाम संपल्यानंतर कामे मिळेनासी झाली असून, शेतीवर अवलंबून असलेले शेकडो शेतमजुरांनी रोजगारासाठी पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि गुजरात, मध्यप्रदेशासारख्या राज्यात स्थलांतर केले आहे. एकट्या जोगलदरी येथील ५० घरांना टाळे ठोकून कामगार मुलाबाळांसह परप्रांतात गेले आहेत, तर साळंबी, कोळंबी, दाभा, कवठळ, कोठारी, चेहेल आदि ठिकाणचे अनेक मजुर परप्रांतात घराला टाळे ठोकून गेले आहेत. प्रामुख्याने उसतोडणीच्या कामाची निवड कामगारांनी केल्याचे या संदर्भातील माहितीवरून कळले आहे.

टॅग्स :washimवाशिम