शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करणाऱ्या ‘मधुमेही’ व्यक्तींचा घेतला जाणार शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

संतोष वानखडे वाशिम : जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळून आले आहे. मधुमेह असलेल्या व्यक्ती कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर ...

संतोष वानखडे

वाशिम : जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळून आले आहे. मधुमेह असलेल्या व्यक्ती कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून आल्याने खबरदारीचा प्रयत्न म्हणून आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी मधुमेह असलेल्या ज्या व्यक्ती रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्या आहेत, अशा व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत का, याचा शोध घेतला जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असल्याने चिंता कायम आहे. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. म्युकरमायकोसिसने ११ मे रोजी जिल्ह्यात पहिला बळी घेतला. त्यानंतरही म्युकरमायकोसिसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. मुख्यत: मधुमेही, ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले आहे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका अधिक संभवतो. या आजाराला वेळीच आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागही अ‍ॅक्शन मोडवर असून, मधुमेह असलेल्या ज्या व्यक्ती रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्या आहेत, अशा व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत का, यासंदर्भात व्यापक प्रमाणात सर्वेक्षण मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार शहरासह ग्रामीण भागात लवकरच सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांची मदत घेतली जाणार आहे.

०००००

बॉक्स

डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण, आशांना प्रशिक्षण मिळणार!

सर्वेक्षण मोहीम राबविण्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित आशा स्वयंसेविकांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

००००

बॉक्स

...अशी आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे

- गाल, डोळे व दात दुखणे, असह्य डोकेदुखी

- नाक, टाळूला बुरशीचा काळा चट्टा

- चेहऱ्याच्या हाडाला असह्य वेदना

- डोळा लाल होणे, दृष्टी कमी होणे

- नाकातून रक्त येणे

००००

बॉक्स

म्युकरमायकोसिसचा धोका कुणाला?

मुख्यत: मधुमेही, ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले आहे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, कोविडनंतर येणारी अशक्ती, बर्न्स, ल्युकेमिया, दीर्घकालीन स्टेरॉइडचा वापर, अयोग्य पोषण, अशा व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असतो.

०००००

एकूण कोरोनाबाधित- ४०,१७३

सक्रिय रुग्ण- १,९९३

००००००

एकूण डॉक्टर- ३२०

आरोग्य कर्मचारी- १,७६०

आशा स्वयंसेविका- ४९०

०००००

कोट बॉक्स

वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोरोनातून बरे झालेल्या मधुमेह असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले असून, आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नंतर आशा या आपापल्या कार्यक्षेत्रात असलेल्या मधुमेह रुग्णांची माहिती संकलित करण्याबरोबरच काही लक्षणे आहेत का, काही त्रास जाणवतो का, याची माहिती घेणार आहेत.

-डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी

००००