शिरपूर जैन (जि. वाशिम): येथील तीन आरामशीनची तपासणी केली असता, योग्य ती परवानगी नसल्याच्या कारणास्तव मालेगावच्या तहसीलदार सोनाली मेटकर यांनी १३ डिसेंबर रोजी तिन्ही आरामशीनला सील ठोकण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करीत कर्मचार्यांनी तातडीने सील ठोकले. शिरपूर जैन येथे रिसोड फाटा परिसर, गवळीपुरा व जुन्या आठवडी बाजारात अशा तीन आरामशीनद्वारे ेमागील कित्येक वर्षांंपासून लाकडे कटाईचा व्यवसाय सुरू आहे. अशातच १३ डिसेंबर रोजी मालेगावच्या तहसीलदार सोनाली मेटकर यांनी तीनही आरामिल चालकांना योग्य ती परवानगी आणि त्यासंबंधीच्या कागदपत्रांची मागणी केली. आरामशीन चालकांकडे आरामशीन चालविण्यासाठी लागणारी योग्य ती परवानगी तसेच लाकडे का पण्यासाठी लागणारी उपविभागीय अधिकार्यांची परवानगी आढळली नाही. विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी आरामशीन सुरू आहेत, त्या जागा निवारा बांधकामसाठी घेण्यात आल्या असून, एका मिलची जागा अकृषक नव्हती. या कारणावरून तहसीलदारांनी तिन्ही मशीनला सील लावले. ही कारवाई तहसीलदार मेटकर, मंडळ अधिकारी दिनकर केंद्रे, एम.डब्ल्यू. खुळे, तलाठी साठे, अंबुलकर, नागेश घुगे, पंडित घुगे, जीप चालक दत्ता ताकतोडे, बी.एस. घुगे व शिरपूरचे दोन पोलीस कर्मचार्यांनी रविवारी केली.
तीन आरा मशीनला ठोकले सील!
By admin | Updated: December 14, 2015 02:33 IST