शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

अवैध वीजजोडणी प्रकरणावर पडदा टाकण्याच्या हालचाली!

By admin | Updated: August 14, 2015 01:01 IST

अनसिंगच्या प्रकरणाला वेगळे वळण; वीज चोरी भोवती फिरते कारवाई.

संतोष वानखडे/वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग ग्रामपंचायतच्या वीजचोरीचा गोरखधंदा ह्यलोकमतह्णने १0 ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणताच, पडद्यामागील घडामोडी हळूहळू उजेडात येत आहेत. दरम्यान, केवळ अवैध वीजजोडणी तोडून सदर प्रकरण रफादफा करण्याच्या दिशेने वीज वितरण कंपनीचे पाऊल पडत असल्याचे एकंदरित परिस्थितीवरून दिसून येते. वीज गळती व वीज चोरी या दोन प्रमुख समस्यांनी वीज वितरण कंपनीची डोकेदुखी वाढविली आहे. वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनी सर्वतोपरी प्रयत्नशील असतानाच, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे नेमके याऊलट घडले. वीज वितरण कंपनी शाखा अनसिंगच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी, पथदिव्यांच्या अवैध वीजजोडणीला अभय देऊन एकप्रकारे कंपनीच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचा सूर सर्वसामान्य ग्राहकांमधून उमटत आहे. तब्बल एका महिन्यापासून अनसिंगातील पथदिवे दिवसाही सुरू होते. या पथदिव्यांना अवैध वीजजोडणी दिल्याने साहजिकचा याचा आर्थिक भार अन्य ग्राहकांच्या खात्याकडे वळता झाला. हा प्रकार वीज वितरण कंपनी शाखा अनसिंगच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना माहित असतानाही, याविरूद्ध कुणी कारवाईचा बडगा उगारू नये, ही बाब कुठेतरी पाणी मुरत असल्याच्या बाबीला दुजोरा देणारी ठरत आहे. ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशनद्वारे हा प्रकार उजेडात आणल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून अवैध वीजजोडणी तोडण्याबाबत जलदगतीने चक्रे फिरली. मात्र, तुर्तास तरी ही कारवाई अवैध वीजजोडणी तोडण्यापुरती र्मयादीत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.