शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील भंगार शासकीय वाहनांचा लिलाव रखडलेलाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:28 IST

वाशिम : जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या विविध शासकीय कार्यालयांत भंगार वाहने जैसे-थे पडल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देवाहनांचा लिलाव करण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना राज्याच्या वित्त विभागाकडून ३ वर्षांपूर्वी देण्यात आल्या आहेत. लिलावातून जमा झालेली रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्याच्याही सुचना होत्या.जिल्ह्यातील प्रत्येक विभागाच्या विविध ठिकाणच्या कार्यालयांत असंख्य वाहने पडून असल्याचे दिसत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध शासकीय कार्यालयांमध्ये पडून असलेली निरूपयोगी, भंगार, निर्लेखित वाहनांची विक्री चालू महिना संपण्यापूर्वी लिलावाद्वारे करण्याच्या सूचना वित्त विभागाने सर्व कार्यालय प्रमुखांना १३ आॅगस्ट २०१५ रोजी दिल्या होत्या. त्या संदर्भात जिल्हास्तरावर पत्रही पाठविण्यात आले होते; परंतु या सुचनेला तीन वर्षे उलटत आली तरी, जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या विविध शासकीय कार्यालयांत भंगार वाहने जैसे-थे पडल्याचे चित्र दिसत आहे.विविध शासकीय कार्यालयांमध्ये पडून असलेली निरूपयोगी, भंगार, दुरुस्ती न होण्यासारखी अथवा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, यंत्रसामग्री, तसेच वाहनांचा लिलाव करण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना राज्याच्या वित्त विभागाकडून ३ वर्षांपूर्वी देण्यात आल्या आहेत. या लिलावातून जमा झालेली रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्याच्याही सुचना होत्या. तत्पूर्वी, बंद पडलेल्या वाहनांचे निर्लेखन प्रमाणपत्र परिवहन विभागाकडून घ्यावे लागणार होते. त्यानंतर वाहनांची विक्री करण्याचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करताना, यापूर्वी निर्लेखित वाहनांपैकी किती वाहनांची विक्री करण्यात आली आणि त्यातून शासनाला किती निधी प्राप्त झाला, याबाबत सविस्तर माहितीही सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ही कार्यवाही न केल्यास नवीन वाहनांच्या खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता मिळणार नसल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले होते. आता वित्त विभागाच्या निर्णयाला ३ वर्षे उलटत आली तरी, जिल्ह्यातील प्रत्येक विभागाच्या विविध ठिकाणच्या कार्यालयांत असंख्य वाहने पडून असल्याचे दिसत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे लघू सिंचन, आरोग्य, पाटबंधारे विभाग, पंचायत समित्या, तहसील कार्यालयांत अद्यापही भंगार वाहने पडूनच असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमPolice Stationपोलीस ठाणे