शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतील वीजजोडणीसाठी प्रशासनातर्फे चाचपणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:53 IST

वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्याप वीजपुरवठा पोहोचला नाही.अशा ठिकाणांचा शोध घेतल्यानंतर याची इत्यंभूत माहिती महावितरणकडे दिली जाणार आहे.जास्त लोकसंख्येच्या गावातील जिल्हा परिषद शाळांवर लक्ष केंद्रीत करून येथे आवश्यक त्या मुलभुत भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे.देशातील ११५ मागास जिल्ह्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या सहयोगाने नीती आयोग ‘कन्वर्जन्स, इन्टग्रेशन अँड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट’ हा उपक्रम राबवित आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात निधी तरतूददेखील करण्यात आली आहे. पोषण, आरोग्य, शिक्षण, मुलभूत पायाभूत सुविधा, कृषी आणि जलसंधारण, आर्थिक समावेशकता आणि कौशल्य विकास या विषयाच्या अनुषंगाने मागास जिल्ह्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण, आरोग्य, मुलभूत पायाभूत सुविधा या विषयाला सर्वाधिक  प्राधान्य असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे चाचपणी केली जात आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्याप वीजपुरवठा पोहोचला नाही. त्यामुळे या ठिकाणी डिजिटल स्कूल ही संकल्पना राबविणे कठीण आहे. अशा ठिकाणांचा शोध घेतल्यानंतर याची इत्यंभूत माहिती महावितरणकडे दिली जाणार आहे. अशा शाळांमध्ये वीजजोडणी देण्यासाठी आवश्यक तेथे विद्युत खांब उभारणी केली जाणार आहे. जास्त लोकसंख्येच्या गावातील जिल्हा परिषद शाळांवर लक्ष केंद्रीत करून येथे आवश्यक त्या मुलभुत भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर