शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीत भरली चिमुकल्यांची शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:18 IST

मंगरुळपीर : समायोजनातून नियुक्ती झाल्यानंतरही शिक्षिका शाळेवर रुजू होत नसल्याने तालुक्यातील चिखली येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने आक्र मक होत, २ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समितीतच विद्यार्थ्यांची शाळा भरविली. हा प्रकार कळल्यानंतर  जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी थेट मंगरुळपीर पंचायत समिती कार्यालय गाठले आणि गटशिक्षणाधिकारी व बीडीओ यांना बोलावून सदर शिक्षिकेस तत्काळ चिखली येथील शाळेवर रुजू होण्याचा आदेश काढण्याची सूचना केली.

ठळक मुद्देमंगरुळपीर येथील प्रकार जि.प. उपाध्यक्ष ठाकरे यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर : समायोजनातून नियुक्ती झाल्यानंतरही शिक्षिका शाळेवर रुजू होत नसल्याने तालुक्यातील चिखली येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने आक्र मक होत, २ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समितीतच विद्यार्थ्यांची शाळा भरविली. हा प्रकार कळल्यानंतर  जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी थेट मंगरुळपीर पंचायत समिती कार्यालय गाठले आणि गटशिक्षणाधिकारी व बीडीओ यांना बोलावून सदर शिक्षिकेस तत्काळ चिखली येथील शाळेवर रुजू होण्याचा आदेश काढण्याची सूचना केली.मंगरुळपीर तालुक्यातील चिखली येथे प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिक्षकांची दोन पदे रिक्त होती. अशातच  जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या शिक्षण समायोजन प्रक्रियेंतर्गत दोन्ही रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यातील एका शिक्षिकेने आपला पदभार सांभाळला, तर मंगरुळपीर शहरातील जि.प. शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मात्र रुजू होत नव्हत्या. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आशिष चौधरी यांच्यासह पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने ही समस्या पं.स. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मांडली. त्यावरुन गटशिक्षणाधिकार्‍यांनी जि.प. शाळा मंगरुळपीरच्या मुख्याध्यापकांना २८ जुलै रोजी पत्र पाठवून चिखली येथे समायोजनातून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिकेला कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला. तथापि मंगरुळपीर जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. या प्रकारामुळे चिखली येथील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन आशिष चौधरी यांनी पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह शाळेतील विद्यार्थी पंचायत समितीत आणून, तिथेच शाळा भरवून निषेध केला. जि.प. उपाध्यक्ष चंदक्रांत ठाकरे यांनी यावेळी मंगरुळपीर पंचायत समिती गाठली आणि पं.स.गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना या प्रकरणासंदर्भात जाब विचारला. तसेच चिखली शाळेत रुजू होण्यास टाळाटाळ करणार्‍या शिक्षिकेला तत्काळ बोलावुन शाळेवर रुजू होण्याचा आदेश काढण्याची सूचना केली. अधिकार्‍यांनी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या सूचनेनुसार सदर शिक्षिकेला बोलावून चिखली शाळेवर रुजू होण्याचा आदेश दिला. त्यानंतर चिखली येथील पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने आपले आंदोलन मागे घेतले.