लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१९-२० मध्ये इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण प्राप्त करून पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने १५ आॅक्टोबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत.देशरक्षणार्थ सेवा देणाºया माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण भासू नये, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून सैनिक कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी इयत्ता दहावी, बारावीमध्ये ६० टक्के गुण प्राप्त केले आहेत, त्यांना १५ आॅक्टोंबर २०२० पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वाशिम येथे कागदपत्रासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. इयत्ता दहावी, बारावी, पदविका व पदवी परिक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, केंद्र व राज्य शासनाची इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा महाविद्यालयाचा, संस्थेच्या प्राचार्याचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र) घेऊन शिष्यवृत्तीची मंजूरी घ्यावी लागणार आहे. माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची व रेशनकार्डची साक्षांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
माजी सैनिकांच्या पाल्यांनाही मिळणार शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:15 IST