इयत्ता ५ वी ची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरिता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केन्द्र शाळा या केन्द्रावर १३६ पैकी १२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली .केन्द्र प्रमुख म्हणून महेंद्र गुलाबराव रंगारी यांनी काम पाहिले .तर निरीक्षक म्हणून सहायक अध्यापक उघडे तथा खंडारे यांनी यशस्वी भूमिका बजावली.
इयत्ता ८ वी च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरीता जिल्हा परिषद विद्यालय या केन्द्रावर ८६ पैकी ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली . केन्द्र प्रमुख म्हणून मुख्याध्यापक मिलिंद खडसे यांनी काम पाहिले .तर निरीक्षक म्हणून मुरलीधर जाधव यांनी भुमिका पार पाडली . परीक्षेदरम्यान एन. डी. केळतकर यांनी दोन्ही परिक्षा केन्द्राना आकस्मिक भेटी देऊन शिष्यवृत्ती परीक्षा शांततामय वातावरणात सुरू असल्याने समाधान व्यक्त केले .