कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या सभापती रविता रोकडे, सर्व जिल्हा परिषद सदस्य व पं.स. सदस्य तसेच गटविकास अधिकारी कालितास तापी, भाजप तालुका अध्यक्ष डाॅ. राजीव काळे, विजय काळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यात सर्वोत्कृष्ट घरकुल बांधणाऱ्या सरपंच व लाभार्थी तसेच पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मनभा येथील सरपंच वहीद बेग सत्तार बेग, उंबर्डा सरपंच राज चाैधरी, आखतवाडा सरपंच योगिता चंदू गावंडे, शहा हर्षल तायडे, बेबळा रेखा जवंजाळ, कामरगाव साहेबराव तुमसरे यांचा सत्कार कार्यक्रम तर घरकुल बांधणा-या लाभार्थ्यांपैकी कामरगाव मंगलपा बावने, मीना लुटे, मनभ रंजना शेवतकर, जयपूर धर्मेंद्र पंडित, शेषराव सावळे यांच्यासह पंचायत समितीमधील गृहनिर्माण अभियंता धीरज काळे, देवेंद्र भेलांडे, ऑपरेटर सचिन ठोंबरे, गोपाल जिचकार यांचाही आमदार पाटणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचायत समितीमधील इंजिनीअर संजय पवार, वैशाली राऊत, पवन कदम यांची उपस्थिती होती.
-----------
निमंत्रण न दिल्याने त्या सरपंचांची नाराजी
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वाशिमअंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल बांधणाऱ्या लाभार्थींच्या सत्कारासाठी कारंजा पंचायत समितीत आयोजित कार्यक्रमाला कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे गावचे सरपंच तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे सदस्य सागर ढेरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नसल्याने ढेरे यांनी प्रशासनाप्रति नाराजी व्यक्त केली.