शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटायझरच्या विक्रीत ७० टक्के घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 12:16 IST

Sanitizer sales down in Washim : जुलै महिन्यापासून सॅनिटायझरच्या विक्रीत जवळपास ७० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकही निश्चिंतच होत असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यापासून सॅनिटायझरच्या विक्रीत जवळपास ७० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरोघरी सॅनिटायझरने बाटल्या भरलेल्या असायच्या. सावधगिरीचा प्रयत्न म्हणून घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे मारला जात होता. असे. मात्र, अनलॉक सुरू झाले, लसीकरणामुळे शहरवासीयांमध्ये बिनधास्तपणा आला आणि सॅनिटायझरचा हळूहळू विसर पडत चालला आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. प्रत्येकाने मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे दिला जात आहे. मात्र, शहरात अजूनही २० ते २५ टक्के नागरिक विनामास्क फिरताना दिसतात. दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून सॅनिटायझरची विक्री तब्बल ७० टक्क्यांनी घटली आहे. कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यामुळे लोकांनी सॅनिटायझर खरेदी करणे कमी केले होते. मात्र, पुन्हा फेब्रुवारी-२०२१ मध्ये दुसऱ्या लाटेमुळे सॅनिटायझरची विक्री वाढली. जून महिन्यापासून दुसरी लाट ओसरत आहे तसेच लसीकरणालादेखील गती मिळत आहे. त्यामुळे निर्बंध असतानाही लोक निर्बंधमुक्त झाल्यासारखे वावरत असल्याचे दिसून येते.  

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या