शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:36 IST

शेतकºयांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : सततच्या नापीकीमुळे, दुष्काळाच्या भिषण दाहकतेमुळे आणी शासकिय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शेतककºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ  पडला आहे . यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळ निवारणासाठी, शेतकर्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शेतकºयांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकºयांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद असलेल्या मागण्यांमध्ये  राज्यातील शेतकर्यांना पेरणी साठी एकरी दहा हजार रुपये देण्यात यावे ,  चारा छावण्यांची संख्या वाढवावी ,  नागरिकांना व जनावरांना  पिण्यासाठी मुबलक शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे ,  शेतकर्यांची सरसकट कर्ज माफी देणयात यावी , शेतकर्यांना शेतीपंपाची विद्युत बिले माफ करावीत,  शेतकर्यांच्या मुला मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ करावे ,  शेतकर्यांना बिनव्याजी २ लाख रुपये कर्ज देण्यात यावे , ७२ हजार रिक्त जागेवर मराठा आरक्षण लागू करून नोकर भरती तात्काळ करण्यात यावी ,  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला २ हजार कोटी रुपये निधी तात्काळ वर्ग करण्यात यावा समावेश आहे. सदर मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा या जनहिताच्या मागणीसाठी महाराष्ट्राभर संभाजी ब्रिगेड च्यावतीने तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.       निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, उपाध्यक्ष राजुभाऊ कोंघे, कार्याध्यक्ष गणेश अढाव, उपाध्यक्ष प्रमोद महल्ले, उपाध्यक्ष गोपाल देशमुख, संघटक गजानन देशमुख, विशाल उगले, तालुका उपाध्यक्ष किसन मामा इरतकर, गणेश भोयर, अमोल शिंदे, गफूर पप्पुवाले, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड