शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूत पार्लर चालविणारा ‘ज्ञानेश’ मसलापेन गावात उभारतोय ३ कोटी रुपयांचे साई मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:43 IST

शिरपूर जैन  : रिसोड तालुक्यातील छोटेसे गाव मसलापेन. येथील मुळचा रहिवासी असलेले परंतु सद्यस्थितीत बंगळुरू  येथे व्यवसायासाठी गेलेले ज्ञानेश राठोड स्वखर्चातून आपल्या मुळगावी ३ कोटी रुपये खर्चाचे साईमंदिर उभारताहेत.

ठळक मुद्देज्ञानेश ठाकुर हे मुळचे मसलापेन येथील रहिवासी असून गत १६ ते १७ वर्षाआधी ते बंगळुरू येथे गेलेत.त्यांनी १० लाख रुपये किंमतीची १०० बाय १०० जागा रिसोड रस्त्यावरील मसलापेन येथे विकत घेतली.दोन वर्षांपासून या मंदिराचे काम सुरु असून, आतापर्यंत जवळपास २.६५ कोटी रुपये बांधकामावर खर्च करण्यात आले आहे.

शिरपूर जैन  : रिसोड तालुक्यातील छोटेसे गाव मसलापेन. येथील मुळचा रहिवासी असलेले परंतु सद्यस्थितीत बंगळुरू  येथे व्यवसायासाठी गेलेले ज्ञानेश राठोड स्वखर्चातून आपल्या मुळगावी ३ कोटी रुपये खर्चाचे साईमंदिर उभारताहेत. मंदिर उभारणीनंतर येथे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

ज्ञानेश ठाकुर हे मुळचे मसलापेन येथील रहिवासी असून गत १६ ते १७ वर्षाआधी ते बंगळुरू येथे गेलेत. तेथे त्यांनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला. अतिशय मनमिळावू व होतकरु वृत्तीमुळे त्यांच्या व्यवसायाला चांगलीच भरभराटी लाभली. त्यांच्या पार्लरमध्ये कर्नाटकामधील चित्रपटातील अभिनेते, क्रीकेटर येण्यास सुरुवात झाली. मसलापेन येथे वास्तव्यास असताना अतिशय गरिब परिस्थितीमध्ये जीवन कंठत असताना गावाची लाभलेली साथ व गावकºयांच्या प्रेमापोटी आपणही गावात काहीतरी करावे असे मनी इच्छा असतांना त्यांनी गावात साई मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी १० लाख रुपये किंमतीची १०० बाय १०० जागा रिसोड रस्त्यावरील मसलापेन येथे विकत घेतली. व त्यावर साईमंदिराचे बांधकाम करण्यास सुरुवात केली.दोन वर्षांपासून  या मंदिराचे काम सुरु असून आतापर्यंत जवळपास २.६५ कोटी रुपये बांधकामावर खर्च करण्यात आले आहे. येत्या विजयादशमीला साई पुण्यतिथी शताब्दी सोहळयाला या मंदिराचे लोकार्पण करण्याचा ज्ञानेश यांचा मानस आहे. मंदिर लोकार्पणानंतर येथे दररोज भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबविण्याचा मानस ज्ञानेश ठाकुर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडShirpur Jainशिरपूर जैन