शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील रस्ते  ‘लॉक’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:00 IST

Rural roads are also locked in Unlock : सीमावर्ती भागातील रस्ते अद्यापही बंदच असल्याचे भर जहॉंगिर परिसरातील मोहजाबंदी-लोणी-वढव या मार्गावरून दिसून येते. 

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉंगिर : अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी, ग्रामीण भागातील सीमावर्ती भागातील रस्ते अद्यापही बंदच असल्याचे भर जहॉंगिर परिसरातील मोहजाबंदी-लोणी-वढव या मार्गावरून दिसून येते. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या होत्या. नजीकच्या हिंगोली, परभणी, बुलडाणा जिल्ह्यांतून येणारे रस्ते स्थानिक पोलीसपाटील, तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायतीने सीमेवरील रस्त्यावर दगड, मुरूम, झाडाच्या फांद्या टाकून बंद केल्या होत्या. यादरम्यान या सीमेजवळील भागातील गावांच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. साखरा, केलसुला, ब्राह्मणी, कापडसिंगी, रायगाव सावरगाव, गांधारी, शिवणी जाट, देऊळगाव, सोनुना, वढव, हिरडव, आरडव, पहुर, दाभा अशा विविध गावांतील नागरिकांना त्यांच्या स्वजिल्ह्यापेक्षा रिसोड, वाशिम बाजारपेठ जवळ आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त तसेच साहित्य, माल खरेदीसाठी या गावातील नागरिक हे रिसोड, वाशिमला जातात. जिल्हा सीमावर्ती भागामध्ये काही गावांनी थेट जिल्हा सीमाच बंद केल्याने येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला. दरम्यान, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाल्याने जिल्हा सीमावर्ती भागातील रस्तेही मोकळे होणे अपेक्षित आहे. मात्र, मोहजाबंदी-लोणी-वढव या रस्त्यावर अजूनही मुरूम, झाडाच्या फांद्या जैसे थे असल्याने हा मार्ग बंदच आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या