शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

 वाशिम जिल्ह्यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गतच्या अफवांना पूर्णविराम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:05 IST

मालेगाव - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली होती.

ठळक मुद्दे‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली होती.या अफवेवर विश्वास ठेवत अनेकांनी झेरॉक्स सेंटर, टपाल कार्यालयातदेखील मोठी गर्दी केली होती. या संदर्भात लोकमतने वृत प्रकाशित करुन, अशी कोणती योजनाच नसल्याची प्रशासनाची बाजू समोर आणली.

मालेगाव - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली होती. दरम्यान यासंदर्भात २१ डिसेंबरला 'लोकमत' ने वृत्त प्रकाशित करून सत्य परिस्थिती समोर आणली. त्यामूळे नागरिकांनादेखील वस्तुस्थिती लक्षात आली तसेच झेरॉक्स  सेंटरवरूनदेखील ते बनावट अर्ज गायब झाल्याचे शुक्रवारी दिसून आले.स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती करणे आदी उद्देशाने बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियान वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी कोणतीही रक्कम देण्याची शासनाची योजना नाही. मात्र, मालेगाव शहरात या योजनेतून मुलींच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन लाख रुपये मिळणार असून, यासाठी अर्ज भरावे लागणार आहेत, अशी अफवा पसरविण्यात आली होती. या अफवेवर विश्वास ठेवत अनेकांनी झेरॉक्स सेंटर गाठत अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. ग्राहक नोंदणी फॉर्म भरण्यासाठी  टपाल कार्यालयातदेखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरात बेटी बचाओ-बेटी पढाओ या योजनेच्या नावावर शेकडो ‘फॉर्म’ची विक्री होत असल्यासंदर्भात लोकमतने वृत प्रकाशित करुन, अशी कोणती योजनाच नसल्याची प्रशासनाची बाजू समोर आणली. त्यामुळे नागरिकांनी अफवेवर विश्वास न ठेवता आता अर्ज सादर करने थांबविले तसेच बहुतांश झेरॉक्स सेंटरवरूनदेखील अर्ज गायब झाले. अजून दोन ते तीन सेंटरवर अर्ज असल्याची चर्चा असून, ते अर्ज घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करीत असल्याची माहिती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिम