शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २.९० लाख मुला-मुलींना दिली जाणार ‘रुबेला’ लस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 15:33 IST

नोव्हेंबर महिन्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहिम राबविली जाणार असून, त्या अनुषंगाने गावोगावी तसेच शाळा, अंगणवाडी केंद्रांतील मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

वाशिम : नोव्हेंबर महिन्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहिम राबविली जाणार असून, त्या अनुषंगाने गावोगावी तसेच शाळा, अंगणवाडी केंद्रांतील मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील जवळपास २.९० लाख मुला-मुलींना गोवर, रुबेला लसीचा डोज दिला जाणार आहे. गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य विभागासह महिला व बालकल्याण तसेच शिक्षण विभागाचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने गावपातळीवरील कर्मचाºयांच्यावतीने शाळा, अंगणवाडी तसेच गावोगावी सर्वेक्षण करण्यात आले. ९ महिने ते १५ वर्ष वयोगटात गोवर, रुबेलाची प्रकरणे आढळुन येतात. गोवर या आजारामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती झपाट्याने कमी होते. त्यामुळे मुला-मुलींच्या शरीरात व्हिटॅमीन ए ची कमतरता जाणवते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे डायरीया, न्युमोनीया, कुपोषण आदी आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे संपूर्ण बालकांचे लसीकरण होेणे गरजेचे आहे.  नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणा-या या मोहीमेदरम्यान ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना गोवर, रुबेला लसीचा पहिला डोज देण्यात येईल. ११४५ अंगणवाडी केंद्र आणि १३६५ शाळांमधील जवळपास २.९० लाख मुला-मुलींना ही लस दिली जाणार आहे. शाळाबाह्य मुला-मुलींनादेखील गोवर, रुबेला लसीचा डोज दिला जाणार आहे. विविध टप्प्यात प्रशिक्षणगोवर, रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने तालुका तसेच जिल्हास्तरावर विविध टप्प्यात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. गोवर, रुबेला लसीकरण मोहीमेमध्ये आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, एकात्मीक बालविकास प्रकल्प आदींचा समन्वय राहणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिम