शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओकडून खासगी बसेसवर कारवाई, २१६ बसेसची तपासणी: १.७२ लाखांचा दंड वसुल

By दादाराव गायकवाड | Updated: October 18, 2022 19:42 IST

जादा भाडे आकारल्यास बस चालक व मालकांवर कारवाई

वाशिम: जिल्ह्यात स्लिपर कोच बसेसची विशेष तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान १७ ऑक्टोबरपर्यंत २१६ खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. ५९ खाजगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून १ लक्ष ७२ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. आरटीओने खासगी ट्रॅव्हल्ससाठी प्रवाशांकडून आकारण्यात येणारे प्रवासभाडे दरही निश्चित केले असून, प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे आकारणीची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित खाजगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आरटीओकडून खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला आणि प्रवाशांच्या होणाऱ्या पिळवणुकीला आवर घालण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. यात अधिक भाडे आकारल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२६२२४२६६६, टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० किंवा डायट्रो३७-एमएच@गव्हडॉटइन या संकेतस्थळावर तक्रार करता येईल. बस वाहन रस्त्यावर चालवित असतांना तपासणी दरम्यान प्रवाशांकडून जादा भाडे आकारल्याचे दिसून आल्यास बसचे चालक व मालकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. २१ ऑक्टोबर ते ३१ऑक्टोबर या कालावधीत एसटी महामंडळाचे प्रवास भाडे दर १० टक्के अधिक आकारण्यात येत असल्याने खाजगी प्रवासी भाडे दरापेक्षा १० टक्के अधिक भाडे आकारण्याची खाजगी बस वाहतूकदारांना मुभा राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी स्पष्ट केले आहे.खासगी ट्रॅव्हल्ससाठी निश्चित केलेले दरआरटीओने खाजगी ट्रॅव्हल्सकरिता निश्चित केलेल्या भाडे दरानुसार नॉन एसी निमआराम सिटर २.९४ रुपये प्रति कि.मी., एसी सिटर टाटा, अशोक लेलॅन्ड ३.२३ प्रति कि.मी. एसी सिटर व्होल्वो, मर्सिडीज, स्कॅनिया ४.८५ रुपये प्रति कि.मी., नॉनएसी स्लिपर २.९४ रुपये प्रति. कि.मी., एसी स्लिपर टाटा, अशोक लेलॅन्ड ३.७५ रुपये प्रति कि.मी. व एसी स्लिपर व्होल्वो, मर्सिडीज, स्कॅनिया ५.८० रुपये प्रति कि.मी. प्रवासभाडे असेल.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस