शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : प्रवेशपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:10 IST

आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्या व दुसऱ्या लॉटरी पद्धतीत निवड होऊनही विहित मुदतीत ३७८ बालकांनी प्रवेश घेतले नाहीत. आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ‘घर ते शाळा’ या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया ५४३ बालकांची आणि त्यानंतर दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी आणि त्यानंतर प्रवेश अशी ही प्रक्रिया आहे. विहित मुदतीत पालकांनी पडताळणीसाठी कागदपत्रे सादर न केल्याने किंवा शिक्षण विभाग, संबंधित शाळेशी संपर्क न साधल्याने प्रवेशपात्र ९३१ पैकी ३७८ बालकांचे प्रवेश झाले नाहीत. उर्वरीत ५५३ बालकांनी प्रवेश घेतले. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी तिसरी लॉटरी सोडत काढण्यात आली. यावेळी २७० बालकांची निवड झाली. ११ जुलैपासून या बालकांच्या पालकांना ‘एसएमएस’ पाठविले जात आहेत. एसएमएस न आल्यास शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘अ‍ॅप्लिकेशन वाईज डिटेल्स’मध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही हे पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निवडपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून, १६ जुलैपर्यंत ५८ बालकांचे प्रवेश झाले.१८ जुलैपर्यंत पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून, निवडपात्र बालकांच्या पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. १८ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी झाली नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.तिसºया लॉटरी पद्धतीतून जिल्ह्यातील २७० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली आहे. या बालकांच्या कागदपत्रांची १८ जुलैपर्यंत पडताळणी केली जाणार आहे. निवडपात्र बालकांच्या पालकांनी १८ जुलैपर्यंत संबंधित पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा