शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : सोडत जाहीर;प्रवेशप्राप्त बालकांची यादी मात्र मिळालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:36 IST

वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ८ एप्रिल रोजी पहिली राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ८ एप्रिल रोजी पहिली राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली. प्रवेशपात्र बालकांची यादी ९ एप्रिलपर्यंत जिल्हास्तरावर प्राप्त झाली नसून, १० एप्रिलपासून ‘लॉटरी’ लागलेल्या पालकांना एसएमएस पाठविले जाणार आहेत.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई व आयबीसह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहेत, अशा प्रकारच्या शाळा या प्रवेशासाठी जिल्ह्यातील एकूण ९३ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे. एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८७० प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांमधून पहिली लॉटरी ८ एप्रिल रोजी काढण्यात आली. पहिल्या लॉटरी पद्धतीत ‘घर ते शाळा’ या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया बालकांची पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी निवड करण्यात आली. पहिल्या यादीतील कोणत्या बालकांची ‘लॉटरी’ लागली, यासंदर्भातील यादी वरिष्ठ स्तरावरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ९ एप्रिलपर्यंत प्राप्त झाली नाही. १० एप्रिलपर्यंत यादी प्राप्त होईल, असे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले. दरम्यान, लॉटरी लागलेल्या पालकांना १० एप्रिल २०१९ पासून एसएमएस पाठविले जाणार आहेत. एसएमएस न आल्यास शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘अ‍ॅप्लिकेशन वाईज डिटेल्स’मध्ये १९ पासून सुरु होणारा अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का ते पाहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा