शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबिनच्या २०० रुपये अनुदानाचे २२ लाख रुपये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:45 IST

वाशिम : आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडे सोयाबिन विकणाºया शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान वाटपासाठी जिल्ह्याला १४ कोटी ७९ लाख रुपये मंजूर झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडे सोयाबिन विकणाºया शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान वाटपासाठी जिल्ह्याला १४ कोटी ७९ लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, अद्याप काही शेतकºयांनी आवश्यक पुरावे सादर न केल्याने त्यातील २२ लाख रुपये अनुदान विनावाटप पडून आहे. दरम्यान, आगामी महिनाभरात शेतकºयांकडून प्रतिसाद न मिळाल्यास सदर रक्कम शासनाकडे परत पाठविली जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली. शासनाकडून शेतकºयांना वाटप करण्यासाठी आलेली १४.७९ कोटी रुपयांची रक्कम त्या-त्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. दरम्यान, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समित्यांमध्ये सोयाबिनची विक्री करणाºया शेतकºयांकडून बँक खाते क्रमांक, आधारकार्ड यासह आवश्यक माहिती मागविण्यात आली होती. सुमारे ९६ टक्के शेतकºयांनी त्यानुसार माहिती सादर केल्याने संबंधितांना देय अनुदान त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले. मात्र, ४ टक्के शेतकºयांचा वारंवार ‘फॉलोअप’ घेवून देखील त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आणखी महिनाभराची मुदत संबंधितांना देण्यात आली असून याऊपरही संबंधित शेतकºयांकडून प्रतिसाद मिळाला नाही तर २२ लाख रुपयांची शिल्लक असलेली रक्कम शासनाकडे परत पाठविण्याची कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक कटके यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती