शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’ घोटाळा जिल्हा परिषदेच्या दालनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:26 IST

जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेंतर्गतच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली असून, जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला. आता याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन नेमकी काय कारवाई करते, याकडे लक्ष लागून आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात शेततळे, फळबाग लागवड, पाणंद रस्ते, वृक्षारोपण यासह विविध प्रकारची कामे मजुरांद्वारे केली जातात. मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्षही वेधले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि ‘लोकमत’चे वृत्तांकन याची दखल घेत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी डिसेंबर २०२० मध्ये या घोटाळ्याच्या चौकशीसाठी यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले १० विशेष पथक गठीत करीत चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास विनाविलंब सादर करण्याचे निर्देशही दिले होते. १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी या १० पथकाने केली. फेब्रुवारी महिन्यात या पथकाने संनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला. मात्र ‘मार्च एन्डींग’ आणि कोरोना विषाणू संसर्गाचे संकट यामुळे मध्यंतरी याप्रकरणी प्रशासकीय कार्यवाही प्रभावित झाली. दरम्यान, जुलै महिन्यात संनियंत्रण अधिकाºयांकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाºयांकडून हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. १० दिवसांपूर्वी हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागून आहे. 

कारवाई होणार की क्लिन चीट मिळणार? चौकशीअंती दोषी आढळून आलेल्या अधिकारी, कर्मचाºयांवर यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अनेक कारवाया केल्या.  मालेगाव तालुक्यातील रोहयोंतर्गतचा घोटाळा विशेष गाजला असून, यामध्ये दिग्गजांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोषी आढळून येणाºया या दिग्गजांवर खरोखरच कारवाई होणार की अहवालातील काही मुद्यांचा आधार घेत क्लिन चीट मिळणार? यावर सध्या जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा रंगत आहे.मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामांचा चौकशी अहवाल १० दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. या अहवालांचे वाचन बारकाईने केले जाईल. दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई प्रस्तावित करून हा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.- कालिदास तापीप्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारीपंचायत विभाग, जिल्हा परिषद वाशिम

मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करून संबंधित दहाही पथकांनी त्यांचे अहवाल सादर केले. या अहवालांचे वाचन करून त्यानुसार हा अहवाल सादर केला. विभागीय आयुक्तांकडून पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडे देण्यात आला.- शंकर तोटावार

संनियंत्रण अधिकारी तथाजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद