----------
डवरणीत शेतकरी व्यस्त
वाशिम: सध्या पावसाने चार दिवसांपासून उसंत घेतल्याने शेतजमीन डवरणीसाठी योग्य झाली आहे. त्यामुळे डवरणी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे २९ जुलैदरम्यान दिसून आले. प्रामुख्याने सोयाबीन पेरणीवर शेतकऱ्यांचा अधिक भर आहे.
-----------
बागापूर प्रकल्पावर वाढली झुडपे
वाशिम : कारंजा तालुक्यातील बागापूर येथील प्रकल्पाची दुरुस्ती प्रलंबित असतानाच या प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून, मूळ खोलवर जाऊन प्रकल्पाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे.
कठडे नसलेल्या पुलामुळे अपघाताची भीती
वाशिम : मालेगाव तालुक्यातील अमानी ते पांगरी रस्त्यादरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे नाल्यास पूर आल्यावर या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असून, येथे अपघाताची भीतीही वाढली आहे.
-------
आसेगाव येथे पसरली अस्वच्छता
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथे पावसामुळे साचलेल्या गटाराने अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आसेगाव येथे अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे साचतात.
------------
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून, त्यामुळे बाबंर्डा कानकिरड परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यातच पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे.
-------------
पोहा परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : कारंजा तालुका कृषी विभागाच्यावतीने पेरणीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याअंतर्गत परिसरातील काही गावांत कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कीटकनाशक फवारणीपूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
-----------
पाणंद रस्त्यावर चिखल
काजळेश्वर : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरातील पाणंद रस्त्यांचे काम अर्धवट राहिल्याने या रस्त्यांवर पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतात साहित्याची ने-आण करताना अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. याची दखल घेऊन तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.