शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला जीवदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:29 IST

वाशिम: चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला दोन तासांच्या परीश्रमानंतर बाहेर काढण्याची कामगिरी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव इंगळे व त्यांच्या सहका-यांनी शुक्रवारी केली.

ठळक मुद्देपेडगाव येथील घटनामंगरुळपीरमधील वन्यजीव पे्रमींचा पुढाकार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला दोन तासांच्या परीश्रमानंतर बाहेर काढण्याची कामगिरी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव इंगळे व त्यांच्या सहका-यांनी शुक्रवारी केली. मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव शिवारातील शेतात पाण्याच्या शोधात आलेल्या रोहिच्या कळापातील एक रोही चार दिवसांपूर्वी विहिरीत पडला होता. मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव शिवारात उमेश भगत यांनी विहिरीचे खोदकाम केले आहे. या विहिरीचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यांच्या शेतात तूर पिक चांगले बहरले असून, पाच ते सहा फुट उंच वाढलेल्या पिकात वन्यप्राण्यांचा संचार असतो. अशात मंगळवारी सांयकाळच्या सुमारास रोहिचा एक कळप भगत यांच्या शेतात आला. त्यावेळी तुरीच्या पिकामुळे विहिर प्राण्यांना दिसली नाही. त्यामुळे एक रोही विहिरीत पडला. सदर प्रकार भगत यांच्या लक्षात आला आणि त्यांनी रोहिला बाहेर काढण्याचे प्रयत्नही केले; परंतु साधने मर्यादित असल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर त्यांनी गुरुवारी सांयकाळी याबाबत वनविभाग मंगरुळपीर आणि मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कंन्झर्वेशन टीमला माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच मंगरुळपीर वनविभागाचे राऊंड आॅफिसर अब्दुल हकिम, कारंला वनविभागाचे व्ही. बी. इंगळे आणि जी. एस. थेर यांच्यासह मंगरुळपीरचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यासह वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरचे सुबोध साठे, शुभम ठाकूर आणि संदीप ठाकरे यांच्यासह इतर सहकाºयांनी सकाळी १२ वाजता पेडगाव येथे जाऊन उमेश भगत यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या रोहिला दोन तासांच्या प्रयत्नानंतर रोहिला सुखरूप बाहेर काढले. पुन्हा एकदा वनविभागाच्या अपुºया सुविधांमुळे वन्यजीव प्रेमींना रोहिचा जीव वाचविण्यासाठी गावकºयांचा आधार घ्यावा लागला. ट्रॅक्टरचा आधार घेऊन दोराच्या साहाय्याने रोहिला बाहेर काढावे लागले. 

टॅग्स :forestजंगल