शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते गेले खड्ड्यात; पाणी साचतेय डबक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

वाशिम : शहरातील पुसद नाक्यापासून रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे ...

वाशिम : शहरातील पुसद नाक्यापासून रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे खड्ड्यांचे रूपांतर घाण पाण्याच्या डबक्यांमध्ये झाल्याने वाहनचालक, नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राम ठाकरे यांनी दिला आहे.

पुसद नाक्यापासून रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या कामादरम्यान दोन्ही बाजूच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. या मार्गावर शाळा, हॉटेल्स, दवाखाने व इतर व्यावसायिक कार्यालये असल्याने वाहनांची नियमित वर्दळ असते. जड वाहने देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. सततच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. पाण्याचा अंदाज येत नसल्याने दैनंदिन अपघाताच्या घटना घडत आहेत. ही बाब लक्षात घेता बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

..............

नवरात्रोत्सवात राहते रस्त्यावर गर्दी

रेल्वे गेटपासून जवळच महाकाली देवीचे मंदिर वसलेले आहे. आगामी काही दिवसांत नवरात्रोत्सवास सुरुवात होणार असून मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची रस्त्यावर दैनंदिन गर्दी राहणार आहे. या काळात रस्ता नादुरुस्तीमुळे विशेषत: महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

..................

कोट :

रस्त्याची दुरुस्ती करण्यासंबंधी यापूर्वी विविध राजकीय पक्ष, संघटनांनी बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या; मात्र त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. आता मात्र संयम संपला असून रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.

-राम ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते, वाशिम