शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडमधील शिधापत्रिकाधारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 19:53 IST

रिसोड : शिधापत्रिकाधारकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारिप-बमसंने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आणि ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर, १२ फेब्रुवारीपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास सुरूवात झाली.

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचा भारीप बमसंने केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : शिधापत्रिकाधारकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारिप-बमसंने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आणि ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर, १२ फेब्रुवारीपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास सुरूवात झाली.रिसोड तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयाकडे विविध समस्यांबाबत अर्ज सादर केले आहेत; परंतु त्या निकाली काढण्याबाबत तहसील प्रशासनाची उदासिनता होती. शेकडो शिधापत्रिकाधारकांनी नवीन शिधापत्रिका मिळणे, शिधापत्रिका विभक्त करणे, शिधापत्रिकेत नवीन नाव जोडणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, शिधापत्रिका आॅनलाइन करणे आदिंसाठी अर्ज सादर केले होते. तथापि, ही प्रकरणे निकाली काढण्यास विलंब लागत असल्याने सर्वसामान्य, गोरगरिब जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेवून भारिप बहुजन महासंघ रिसोड शहर व तालुकाच्यावतीने शहर अध्यक्ष प्रदिप वसंतराव खंडारे यांच्या नेतृत्वात रिसोडच्या तहसिलदारांना निवेदन दिले होते. १० दिवसांत प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून दिला होता.   यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत १२ फेब्रुवारीला जवळपास १०० शिधापत्रिकाधारकांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या. भारिप-बमसंतर्फे केशवराव संभादिडे, शे.ख्वाज भाई, अब्दुल मुनाफ, विजय सिरसाट, विश्वनाथ पारडे, डाँ.रविंद्र मोरे पाटील, मुनव्वर खत्री, अर्जुन डोंगरदिवे, प्रदिप खंडारे, गौतम धांडे व शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हा प्रश्न लावून धरला होता.

टॅग्स :Risodरिसोड