लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंंदू म्हणून पंचायत समितीचे महत्त्व आहे. येथे गटविकास अधिकाऱ्यांसह अन्य महत्त्वाची पदे रिक्त आहेत. जानेवारी २०१६ मध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून एम.बी. घसाळकर यांची यवतमाळ येथे बदली झाली. तेव्हापासून सदर पद हे प्रभारीच्या भरवशावरच सुरू आहे. यादरम्यान व्ही.पी. पुजारी यांनी काही दिवसांपुरता कायमस्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार पाहिला. त्यांची दोन महिन्यांच्या आतच बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. पं.स. सभापती व उपसभापतींनी तीव्र विरोध केल्याने आणि यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नियमावलीबाबत विचारणा केल्याने हा प्रभार काढून घेण्यात आला. आता येथे कायमस्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून एस.डी. भारसाकळे यांची नियुक्ती झाल्याची माहिती आहे. भारसाकळे हे यशदा, पुणे येथे संशोधन अधिकारी तथा सहायक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीवर ते रिसोड येथे बीडीओ म्हणून येत आहेत. ११ व १२ मे रोजी सभापती छाया पाटील व उपसभापती महादेव ठाकरे यांनी गटविकास अधिकारी पदाच्या प्रभाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याशी चर्चा केली. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात विस्तार विस्तारी (सांख्यिकी) असलेल्या मदन नायक यांच्याकडे प्रभार कसा सोपविला, याचा जाब पदाधिकाऱ्यांनी विचारला. शुक्रवारीच गणेश पाटील यांनी नायक यांचे आदेश रद्द करून शृंगारे यांच्याकडे प्रभार सोपविला. आता पदोन्नतीवरून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी रिसोड येथे येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कायमस्वरूपी बीडीओ मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रिसोड पंचायत समितीला रिक्त पदांचे ग्रहण!
By admin | Updated: May 15, 2017 01:21 IST