शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागे अभावी रिसोड येथील नाफेडच्या तूर खरेदीत व्यत्यय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:07 IST

रिसोड: किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, तूर साठवणूकीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने विहित मुदतीत तूरीची खरेदी होणार की नाही याबाबत साशंकता आहे.

ठळक मुद्दे. नाफेड खरेदी सुरू ठेवण्याची मागणी झाल्याने शासनाने १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  रिसोड येथे ३३४१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. १५ दिवसांत अडीच हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांची तूर मोजणी पूर्ण करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

रिसोड: किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, तूर साठवणूकीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने विहित मुदतीत तूरीची खरेदी होणार की नाही याबाबत साशंकता आहे. रिसोड येथे ३३४१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, जवळपास ५५० शेतकऱ्यांची ६ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

गतवर्षी शेतकऱ्यांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागले. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. विविध संकटातून वाचलेले तूर पीक  शेतकऱ्यांच्या घरात आले. केंद्र सरकारने तूरीला किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. मात्र, खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने तूरीची खरेदी होत असल्याने नाफेड खरेदी केंद्राची मागणी पुढे आली होती. त्या अनुषंगाने रिसोड येथील खरेदी केंद्रावर हमीभावाने तूर खरेदी करण्यात आली. तत्पूर्वी शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. शासनस्तरावरून १८ एप्रिल रोजी नाफेडची तूर खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. नाफेड खरेदी सुरू ठेवण्याची मागणी झाल्याने शासनाने १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तूर मोजणीचा वेग आणि साठवणुकीसाठी पुरेशा प्रमाणात गोदामात जागा नसल्याने विहित मुदतीत तूर खरेदी होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.  रिसोड येथे ३३४१ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. १५ दिवसांत अडीच हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांची तूर मोजणी पूर्ण करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड